धक्कादायक : रिक्षात बसण्यावरून मित्रांमध्ये भांडण, एकाने केली दुसऱ्याची हत्या

रिक्षाचालक वसीम आणि शेख रेहान यांच्यात रिक्क्षात मागे-पुढे बसण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावादाचं रुपांतर भांडणात झालं. त्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:17 PM IST

धक्कादायक : रिक्षात बसण्यावरून मित्रांमध्ये भांडण, एकाने केली दुसऱ्याची हत्या

सचिन जीरे, औरंगाबद 29 ऑगस्ट : मित्राकडे जेवणासाठी निघालेल्या चार मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून भांडण झालं आणि रागाच्या भरात एकाने दुसऱ्याला भोसकलं. त्यात एका मित्राची हत्या झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय. किरकोळ कारणावरून झालेल्या हत्येनंतर काहीकाळ त्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव शांत केला आणि परिस्थिती निवळली. आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.

शहरातील एस. टी. कॉलनी येथे राहणारा मोहम्मद असिफ  याने आईला मित्रानं सोबत अंबड येथील रौनापरांडा येथे कंदुरी खाण्या करीता जायाचे आहे असं सांगितलं होतं. मित्राच्या फोन ची वाट पहात तो घरातच थांबला होता. काही वेळानंतर असिफला रात्री 11 वाजताच्या सुमारास  मोबाईल वर फोन आला. त्यानंतर तो फोनवर बोलला आणि तयार होऊन निघाला. जाताना मित्रांसोबत रिक्षात जात असल्याचं त्याने आईला सांगितलं होतं.

असिफ आणि त्याचे मित्र शेख रेहान शेख पाशू सोहेल, ईब्राहीम असे रिक्क्षात निघाले. रिक्क्षा चालक वसीम आणि शेख रेहान यांच्यात रिक्षात मागे-पुढे बसण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावादाचं रुपांतर भांडणात झालं. त्या वादातून शेख रेहान शेख पाशु  याने त्याचे कडील धारदार शस्त्राने असिफच्या पोटात व पाठीवर वार केले. हा हल्ला एवढा मोठा होता की त्यात तो रक्तबंबाळ झाला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत असिफच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून सिडको ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींना अटक केलीय.

पोळ्याच्या सणाला बैलांच्या डोळ्यात पाणी, शेतकरी झाला दीनवाणी!

अन्य एका घटनेत मुंबई जवळच्या विरारमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी  आणि सासूवर चाकूने हल्ला केला. आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात त्याची पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाल्या असून पतीने इमारतीवरून उडी मारल्याने तोही गंभीर जखमी आहे. या घटनेने विरारमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading...

SPECIAL REPORT : सीएमचे 'पीए' होणार MLA? शिवसेना सोडेल का जागा?

विरार पूर्वेकडील साईबाबा मंदिर जवळ करसन वासरा आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या पत्नी मंजू यांचं हे दुसरं लग्न होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचं हे लग्न झालं होतं. मंजू यांना आधीच्या पतीपासून एक 11 वर्षांची मुलगीही आहे. मात्र सुरवातीचा काही काळ सोडला तर मंजू आणि कारसन यांचं नेहमी भांडण होत असे. तो कायम मंजूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. करसन याने आज सकाळीही  मंजूला बेदम मारहाण करून चाकूने तिचे हात कापण्याचा प्रयत्न केला.

शाळेत बागडणाऱ्या किड्यांचा मुलांना चावा, 75 मुलं हॉस्पिटलमध्ये

मंजूची आई लक्ष्मी कटारिया याही घरी त्यावेळी घरी होत्या. त्या मंजूला वाचवण्यासाठी पुढं आल्या तेव्हा करसनने त्यांच्यावरही हल्ला करत त्यांना जखमी केलं. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघींनाही रुगणालयात दाखल केलं. करसनने हातावर इजा करून इमारतीच्या गच्चीवरून खाली उडी टाकली. यात तोही गंभीर जखमी झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...