अजब तुझे सरकार, शाळेत सक्ती पण वाहनांवर मराठी अंक असेल तर भरा दंड!

अजब तुझे सरकार, शाळेत सक्ती पण वाहनांवर मराठी अंक असेल तर भरा दंड!

राज्यात सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तीची केली जात आहे. पण सरकारचाच दुसरा विभाग मराठीच्या मुळावर उठला आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

मुंबई, 21 जून : महाराष्ट्र या मराठी भाषकांच्या राज्यात मराठी ही राज्यभाषा आहे. इथला सगळा कारभार मराठीत चालतो. पण महाराष्ट्रातल्या वाहनांवर मराठीत नंबर लिहलेला चालत नाही. वाहनांवरील नंबर प्लेट मराठीत असेल तर राज्य परिवहन विभाग नागरिकांना दंड ठोठावते. राज्यात सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तीची केली जात आहे. पण सरकारचाच दुसरा विभाग मराठीच्या मुळावर उठला आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नव्हे तर मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना दंड ठोठावला जातो.

रस्त्यावर अनेक वाहनांवर आपल्याला मराठीत नंबर दिसतो. भाषेच्या अभिमानातून वाहनांवर मराठीत नंबर टाकले जातात. मराठीसाठी आग्रही असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या बहुतेक सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचे क्रमांक मराठीत आहेत. पण मराठीचा हा आग्रह त्यांना महागात पडतो.

वाहनांवर मराठीत नंबर टाकणं हा आता महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. त्यासाठी दंड ठोठावला जातो. एकीकडे मराठीची सक्ती आणि दुसरीकडे मराठीत अंक लिहले म्हणून दंड... अशात सामान्य नागरिकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. मराठीच्या या मुद्द्यावर सध्या मनसे आक्रमक पाहायला मिळते. आम्ही दंड भरणार नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांकडून देण्यात आली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दंड भरण्यास साफ नकार दिला आहे. एकेकाळी मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणारे दिवाकर रावते आता परिवहन मंत्री झाल्यावर मराठी पाट्या लावणाऱ्यांना दंड ठोठावत असल्याबद्दल मनसेनं टीकेची झोड उठवली आहे. त्यावर आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

VIDEO : बिचुकलेच्या थोबाडीत मारली असती, रुपालीच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading