News18 Lokmat

पुणे: संरक्षक भिंत कोसळली, महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू! Pune | Compound Wall Collapse | Kondhwa

पुण्यातील कोंढवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 10:02 AM IST

पुणे: संरक्षक भिंत कोसळली, महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू! Pune | Compound Wall Collapse | Kondhwa

पुणे, 29 जून: पुण्यातील (Pune) कोंढवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ (NDRF)कडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत मृत झालेले सर्व जण मजुर असल्याचे समजते. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे 17 जण राहत होते. त्यापैकी 15 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत एका व्यक्ती बचावला आहे. बचावलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 4 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.

पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका इमारतीचे काम सुरु होते आणि तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठीच ही कच्ची घरे बांधण्यात आली होती. त्यावरच ही भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला.

Loading...

मृतांची नावे-

1)आलोक शर्मा -28 वर्षे

2)मोहन शर्मा -20 वर्षे

3)अजय शर्मा -19

4)अभंग शर्मा -19

5)रवि शर्मा -19

6)लक्ष्मीकांत सहानी -33

7)अवधेत सिंह -32

8) सुनील सींग -35

9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )

10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )

11) विमा दास -28

12) संगीता देवी -26

जखमी :-

1) पूजा देवी -28 वर्षे

पावसामुळेच कोसळली भिंत- जिल्हाधिकारी

पुण्यात सुरु असलेल्या पावसामुळेच ही भिंत कोसळल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्याच बरोबर या दुर्घटनेला बांधकाम करणारी कंपनी देखील जबाबदार असल्याचे दिसत आहे. 15 जणांचा मृत्यू ही मोठी घटना आहे. सर्व कामगार हे बिहार आणि पश्चिम बंगालमधील आहेत. सरकारकडून त्यांनी मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

VIDEO: पुण्यात मृत्यूचं तांडव! संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: pune
First Published: Jun 29, 2019 06:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...