दिवसभर दुचाकीवर फिरला आणि लोकांना भेटला, बीडमध्ये आता 12 गावात पूर्णपणे कर्फ्यू

दिवसभर दुचाकीवर फिरला आणि लोकांना भेटला, बीडमध्ये आता 12 गावात पूर्णपणे कर्फ्यू

बीड जिल्ह्यात मुंबई, पुण्यावरून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे

  • Share this:

बीड, 28 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 56 वर पोहोचला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात 12 गावात पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीडमध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित  असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यक्तीने शहरात अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहे. दुचाकीवर फिरून हा रुग्ण कोरोनाचा वाहक ठरला आहे. त्याने दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -धक्कादायक! मुंबईतील अपंग मुलाला शिर्डीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये अमानुष मारहाण

त्यामुळे खबरदरी म्हणून पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरासह जिल्ह्यातील बारा गावात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.

जिल्हयात 46 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर उपचारानंतर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बीड जिल्ह्यात मुंबई, पुण्यावरून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याच आढळून आलं आहे.  शहरासह बारा गावात संपूर्ण कर्फ्यू लागू करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवामध्ये मेडिकल दुकानं, दवाखानं  वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.

कोरोना रुग्णाची जिल्ह्यातील स्थिती

एकूण कोरोबाधित - 56

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण - 46 (अतिजोखमीचे 2 रुग्ण)

एकूण बरे झालेले - 03

मयत - 01

पुणे उपचारार्थ हलविलेले 06

महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 56,948 वर

दरम्यान,  राज्य सरकारने बुधवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 56,948 वर पोहोचली आहे.  मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल  2190 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! माजी महापौराला अटक, खंडणी मागत केला होता प्राणघातक हल्ला

27 मे पर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मृत्युमुखी पडल्याची नोंद झालेल्या 105 पैकी 32 मुंबईतले तर 9 पुण्यातले रुग्ण आहेत. एक रुग्ण गुजरातचा आहे.  आतापर्यंत 1897 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.

संपादन - सचिन साळवे

First Published: May 28, 2020 08:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading