'गादीवर झोपा, कोरोना पळवा', खोटी जाहिरात केल्याप्रकरणी भिवंडीत गुन्हा दाखल

'गादीवर झोपा, कोरोना पळवा', खोटी जाहिरात केल्याप्रकरणी भिवंडीत गुन्हा दाखल

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

भिवंडी,18 मार्च:जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा ठाणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बाळसाहेब सर्जेराव डावखर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा...कोरोनामुळे महाराष्ट्रात 'देऊळ बंद', पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं घेतला अजब निर्णय

'गादीवर झोपा, कोरोना पळवा'

अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकांनी 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात 'arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli (Furniture Market) Bhiwandi या मथळयाखाली  जाहिरात प्रसिद्ध केली होती. या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल, असे नागरिकांना आवाहन करून दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिद्ध केली. तसेच सदर मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल, असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरवली.

हेही वाचा..इराणमधून आलेले 22 भाविक कोरोनामुळे महाराष्ट्रात अडकले, पैसे संपल्याने होताहेत हाल

सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलिस ठाणे येथे भादंवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधी द्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाट करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2020 06:12 PM IST

ताज्या बातम्या