वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची आयोगानं घेतली दखल, वीज कंपन्यांना दिले निर्देश

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची आयोगानं घेतली दखल, वीज कंपन्यांना दिले निर्देश

कोरोनाचं संकट, त्यात लॉकडाऊन असताना महावितरणनं वाढील बिल पाठवून ग्राहकांना जोरदार शॉक दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून: कोरोनाचं संकट, त्यात लॉकडाऊन असताना महावितरणनं वाढील बिल पाठवून ग्राहकांना जोरदार शॉक दिला आहे. महावितरण कंपनीने धाडलेल्या हजारो रुपयांच्या बिलांमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. जास्त रकमेची देयके मिळत वीज ग्राहकांनी केल्याल्या तक्रारींची दखल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतली आहे.

हेही वाचा...काय लॉक आणि काय अनलॉक! सरकार पूर्णपणे कन्फ्युज; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी सनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. विजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.

1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.

वीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाऊनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली.

हेही वाचा...कर्मकांड, दशक्रियेचे 'लॉक' कधी उघडणार? राक्षस भुवनमधील पुरोहितावर उपासमारीची वेळ

मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत, असंही आयोगानं म्हटलं आहे.

First published: June 29, 2020, 6:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading