कॉमर्समध्ये शिकणाऱ्या तरुणीचा धक्कादायक मृत्यू, विहीरच्या कठड्यावरुन तोल गेला आणि....

कॉमर्समध्ये शिकणाऱ्या तरुणीचा धक्कादायक मृत्यू, विहीरच्या कठड्यावरुन तोल गेला आणि....

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

पुणे, 09 ऑगस्ट : शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई इथे विहीरीत पडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. वर्षा लक्ष्मण भगत (वय 19 वर्षे) रा.वडगाव रासाई ता.शिरूर जि.पुणे असं मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विमल लक्ष्मण भगत यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा ही वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. वर्षा ही विहीरीवर मोटर चालू करण्यासाठी गेली असावी आणि तिचा पाय घसरुन ती विहीरीत पडली असं फिर्यादीत म्हटलं गेलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण यावर अद्याप काही ठोस पुरावे मिळाले असल्याचं सांगण्यात आलं नाही. त्यामुळे अधिक तपास पोलीस करत आहे.

कोरोनाच्या भीतीने आजोबांनी उचललं टोकाचं पाऊल, पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खळबळ

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीतून वर्षाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर तपास करणं सोपं जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस वर्षाच्या कुटुंबियांचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार सुभाष रूपनवर, श्रावण गूपचे, पोलिस कॉस्टेंबल योगेश गुंड, अक्षय काळे हे करत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 9, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading