Home /News /news /

नवीन वर्षात कर्लस मराठीवर सुरू होणार नवी मालिका; हेमांगी कवी दिसणार प्रमुख भूमिकेत

नवीन वर्षात कर्लस मराठीवर सुरू होणार नवी मालिका; हेमांगी कवी दिसणार प्रमुख भूमिकेत

कर्लस मराठीवर लेक माझी दुर्गा (lek majhi durga) ही नवीन मालिका सुरू होतेय. ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर आधारित आहे.

  मुंबई, 17 जानेवारी- नवीन वर्षात मनोरंजनाच्या रेसमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक मराठी वाहिनी प्रयत्न करत आहेत. अनेक मराठी वाहिन्यांनी नवीन वर्षाचे निमित्त साधत अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. आता या रेसमध्ये कर्लस मराठी (Colors Marathi ) कसं मागे राहिल. कर्लने देखील यानिमित्त एक नवीकोरी मालिकी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका बाप लेकीच्या  (lek majhi durga) नात्यावर देखील आधारित आहे. कर्लस मराठीने नुकता एक प्रोमो आऊट केला आहे. हा प्रोमो शेअर करत कर्लसने म्हटलं आहे की, आईच्या प्रेमापेक्षा बापाच्या डोळ्यातील आग तिला सलतेय, दुर्गा स्वत:च्या अस्तित्त्वासाठी का बरं संघर्ष करतेय? येतेय नवी मालिका #LekMajhiDurga जाणिव “ती”च्या अस्तित्त्वाची, लवकरच #ColorsMarath वर. या मालिकेचे नाव लेक माझी दुर्गा असं आहे. तर या मालिकेत मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी तसेच सुशील इनामदार दिसणार आहे. अभिजित गुरू यांनी मालिकेचे लेखन केलं आहे. मालिका बाप लेकीच्या नात्यावर आधारित असल्याचे प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते. आता प्रेक्षक या मालिका कसा प्रतिसाद देणार याची उत्सुकता लागली आहे.
  काही मालिका या एकाच नात्याभोवती फिरताना दिसतात सध्या प्रत्येक वाहिनीवर माय लेकीच्या नात्यावर असेल किंवा बाप लेकीच्या नात्यावर आधारित एक ना एक मालिका सुरूचा आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरली सध्या चर्चेत असलेली मुलगी झाली हो मालिका ही देखील बाप लेकीच्या नात्यावर आधारित आहे. शिवाय सोनी मराठीवर नव्याने सुरू झालेली तुमची मुलगी काय करते ही मालिका देखील आई आणि लेकेच्या नात्यावर आधारित आहे. वाचा-किरण माने प्रकरण तापलं! चित्रा वाघ यांच्यानंतर रुपाली चाकणकर यांची उडी यासोबत कर्लस मराठीवर आई मायेचं कवच (Aai Mayecha Kavach) ही मालिका देखील आई लेकीच्या नात्यावर आधारित आहे. तर यापैकी काही मालिका काहीसं एकसारखे कथानक व विषय असलेल्याच आहेत. यापैकी अबोली, जाऊ नको दूर नको बाबा व मुलगी झाली हो या मालिका काहीशा एकाच नात्याभोवती फिरताना दिसतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या