Corona Impact: 2020मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द माहितीये?

Corona Impact: 2020मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द माहितीये?

कोरोना (Corona)मुळे या वर्षात लॉकडाऊन (LockDown)हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. कॉलिन्स डिक्शनरीने (Collins Dictionary) लॉकडाऊन या शब्दाची वर्ड ऑफ द इअर म्हणून निवड केली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: जगभरात कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संकट पसरले आहे. त्यामुळे लॉकडाऊन (LockDown) हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. कॉलिन्स डिक्शनरीने (Collins Dictionary) लॉकडाऊन या शब्दाची वर्ड ऑफ द इअर म्हणून निवड केली आहे. या वर्षी हा शब्द सर्वांत जास्त वापरला गेला असून जगभरातील करोडो नागरिकांसाठी हा वेगळा अनुभव असल्याचं या डिक्शनरीचे प्रकाशक हार्पर कॉलिन्स यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन हा शब्द सुमारे 4000 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला होता. तेच प्रमाण 2020 मध्ये वाढून 2.5 लाख वेळा झाल्याचं कॉलिन्स यांचं निरीक्षण आहे.

सर्व जगभरात या आजाराचा प्रभाव दैनंदिन भाषेवर झाल्यामुळे कॉलिन्स यांनी जाहीर केलेल्या 10 वर्ड ऑफ द इयरमधील 6 शब्द हे जागतिक आरोग्य संकटाशी संबंधितच आहेत. Coronavirus, Social distancing, Self-isolate, furlough तसंच lockdown आणि Key worker या शब्दांचा या दहा शब्दांमध्ये समावेश आहे. केवळ की वर्कर या शब्दाच्या वापरामध्ये 60 पट वाढ झाली आहे. या वर्षी समाजासाठी आवश्यक मानली जाणारी ही सेवा आहे. कॉलिन्स मधील भाषा सल्लागार हेलन न्यूजस्टिड म्हणाल्या, 2020 या वर्षावर कोरोना या जागतिक महामारीचा प्रभाव राहिला. आपलं काम, अभ्यास, खरेदी आणि सामाजिक जीवनशैलीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला. जगभरातील अनेक देशांमध्ये दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आहे. त्यामुळे या शब्दाचा वर्ड ऑफ द इयर म्हणून गौरव करण्याची वेळ नाही तर बहुतांश जगासाठी या एका शब्दात अख्ख्या वर्षांचं वर्णन पूर्ण होत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवास, सामाजिक संवाद आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश यावर कठोर प्रतिबंध लागल्याचे कॉलिन्स यांनी म्हटले.

व्हायरसच्या पलीकडे असलेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय घडामोडींशी संबंधित शब्दांचाहीदेखील या यादीमध्ये समावेश आहे. ऑनलाईन डिक्शनरीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्युमुळे ब्लॅक लाइव्ह्स मॅटर्स आंदोलनाची धग अमेरिकेत पसरली होती. यामध्ये संभाषण करताना BLM या शब्दाचा अनेकदा सोशल मीडियावर हॅशटॅग म्हणून वापर करण्यात येत असे. या शब्दाच्या वापरामध्ये  581 पट वाढ झाल्याचं कोलिन्सने म्हटलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरील देखील अनेक शब्दांनी या डिक्शनरीमध्ये भर घातली आहे.

टिक टॉक वापरणाऱ्या व्यक्तींसाठी या शब्दाचा वापर करण्यात येत असे. दक्षिण कोरियातील व्हिडिओ ब्लॉगर्सच्या व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ खाण्याचं चित्रण असतं.  त्याला मुकबँग म्हणतात या शब्दाचा देखील या डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीचादेखील या यादीवर मोठा प्रभाव पडला होता. राजकुमार हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी राजेशाही जबाबदाऱ्यांतून बाहेर पडण्याविषयीचा संदर्भ असलेला ‘मेगझिट’ या शब्दाची देखील या डिक्शनरीमध्ये भर पडली आहे. ‘ब्रेक्झिट’ या शब्दाचा कॉलिन्सच्या डिक्शनरीमध्ये 2016मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता हा शब्द ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 11, 2020, 11:34 PM IST

ताज्या बातम्या