प्रेमावर बंदी! Valentines च्या निमित्ताने कॉलेजमध्ये विद्यार्थीनींनी घेतली प्रेम विवाह न करण्याची शपथ

प्रेमावर बंदी! Valentines च्या निमित्ताने कॉलेजमध्ये विद्यार्थीनींनी घेतली प्रेम विवाह न करण्याची शपथ

शाळा, कॉलेज व महाविद्यालयीन जीवनात मुला मुलींचे प्रेम प्रकरणाचे सूत जुळते आणि याच प्रेम प्रकरणाचे रूपांतर लग्नात होते. मात्र या प्रेम प्रकरणात अनेक दुर्दैवी घटना अलीकडे समोर आल्या.

  • Share this:

अमरावती, 14 फेब्रुवारी : दिवसेंदिवस प्रेम प्रकरणात वाढ होत आहे तर हुंडा घेण्याची पद्धतसुद्धा वाढली आहे. यात मुलीचे नुकसान होते आणि त्यांचं आयुष्य संपतं. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीं चक्क व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह व हुंडा घेणाऱ्या मुलासोबत लग्न न करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा आळा घालण्यासाठी अमरावतीच्या मुलींचा आदर्श घेण्याची गरज आहे.

शाळा, कॉलेज व महाविद्यालयीन जीवनात मुला मुलींचे प्रेम प्रकरणाचे सूत जुळते आणि याच प्रेम प्रकरणाचे रूपांतर लग्नात होते. मात्र या प्रेम प्रकरणात अनेक दुर्दैवी घटना अलीकडे समोर आल्या. हिंगणघाट व धामणगाव येथे घडलेल्या घटना याचं उदाहरण आहे. प्रेम प्रकरणात अनेक मुलींचा संसार उघड्यावर आला असेही पाहायला मिळालं आहे.

इतर बातम्या - औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा; शरद पवार, उद्धव ठाकरेंवर म्हणाले...

याच प्रेम प्रकरणात मुलींचा खून झाल्याच्याही घटना घडल्या. प्रेम प्रकरणात लग्न होत असल्याने आई वडिलांच्या लपून व त्यांचा याला विरोध असूनही प्रेमात लग्न होते. मात्र यात जन्मदात्या आई वडिलांना विसरून हे सर्व प्रकार प्रेमाच्या धुंदीत होतात. रोज प्रेम प्रकरणात होत असलेल्या अत्याचार खून यावर मात करण्यासाठी अमरावतीच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरात मुलींनी अनोखी शपथ घेतली आहे.

इतर बातम्या -रोहित पवारांचा 'Happy Valentines Day' मध्येही टोला, शेअर केलेल्या मेसेजची चर्चा

 हिंगणघाट घटनेतील पिडितेला श्रद्धांजली देत महाविद्यालयीन तरुणीनी "प्रेम, प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची  शपथ घेतली. एकीकडे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस असताना त्यांच्या पूर्वसंध्येला मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली असल्याने या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींचा आदर्श घेण्याजोगा आहे.

इतर बातम्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध, पाहा VIDEO

First published: February 14, 2020, 1:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading