News18 Lokmat

महाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य

मुखेड तालुक्यातील कासारवाडी शिवारामध्ये झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आपलं आयुष्य संपवलं. गणपती उर्फ पारस निवृत्ती नरोट, 24 वर्ष आणि धनश्री माधव चोले, 20 वर्ष असं आत्महत्या करण्याऱ्या दोघांची नावं आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 03:09 PM IST

महाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य

नांदेड, 22 फेब्रुवारी : प्रेम प्रकरणातून आत्महत्या किंवा हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

मुखेड तालुक्यातील कासारवाडी शिवारामध्ये झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाने आपलं आयुष्य संपवलं. गणपती उर्फ पारस निवृत्ती नरोट, 24 वर्ष आणि धनश्री माधव चोले, 20 वर्ष असं आत्महत्या करण्याऱ्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

मृत पारस आणि धनश्री हे मुळचे लातूर जिल्हायतील जळकोट तालुक्यात कोळनूर इथे राहणारे आहेत. पण त्यांनी दुसऱ्या गावी जाऊन आत्महत्या केली. प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला.

सकाळच्या सुमारास, स्थानिक गावकऱ्यांनी पारस आणि धनश्रीचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहिला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असून पारस आणि धनश्रीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पारस आणि धनश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात आता पोलीस कसून तपास करत आहेत.

Loading...

या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं यांदर्भात आणखी माहिती काढण्यासाठी पोलीस पारस आणि धनश्रीच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहे. यात पोलीस प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर आपल्या तरुण वयातल्या मुलांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे पारस आणि धनश्रीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.


VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...