मुंबईकर कुडकुडले तर महाबळेश्वरचं झालं मिनी काश्मीर

मुंबईकर कुडकुडले तर महाबळेश्वरचं झालं मिनी काश्मीर

मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधलं तापमान शून्य डिग्रीवर आलं आहे. वेण्णा लेकपरिसरात पुन्हा दवबिंदू गोठले आहेत.

  • Share this:

महाबळेश्वर, 10 फेब्रुवारी : उत्तर भारतातल्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगात हुडहुडी भरली आहे.  मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधलं तापमान शून्य डिग्रीवर आलं आहे.  वेण्णा लेकपरिसरात पुन्हा दवबिंदू गोठले आहेत. तर वाई साताऱ्यात तापमान 6 डिग्रीवर आहे. कडाक्याच्या थंडीनं अवघा महाबळेश्वर गारठला आहे. तर पर्यटक याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

राज्यातल्या अनेक भागात पारा 2 ते 3 अंशांपर्यंत खाली आला आहे. महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात 2 अंश सेल्सिअस एवढी तपमानात घट झाली. तर रानावनात धुक्याची नाही तर बर्फाची चादर पसरलेली बघायला मिळाली.

अंगणातल्या गाडीवर, रानातल्या पिकांवर पडलेलं दव असो किंवा बादलीत ठेवलेलं पाणी पहाटे हे सगळं गोठून त्याचा बर्फ झाला होता. दुसरीकडे धुळ्यातही आज सकाळी 2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये पारा 3 अंशांवर स्थिरावला आहे.

उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासोबत विदर्भ मराठवाडा आणि कोकण विभागातही पारा सकाळी 7 ते 8 अंशांपर्यंत खाली आलेला बघायला मिळाला. दरम्यान या वाढत्या थंडीचा फटका खासकरून पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातल्या द्राक्षबागांना बसतोय.

नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचं तापमान शनिवारी शुन्य अंश सेल्सिअस इतके होते. तर ही कडाक्याची थंडी सहन न झाल्य़ामुळे 2 वृद्धांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नाशिक आणि नगरमध्ये शीतलहरीमुळे गारपीठ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईकर गारठ्याने हुडहुडले...

आज मुंबईतला या मोसमातला सगळ्यात थंड दिवस म्हणून नोंदवला गेला. आजचं मुंबईतलं किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं कमी होतं. गुडन्यूज म्हणजे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढचे ३ ते ४ दिवस थंडी अशीच कायम राहणार आहे असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं.

परवा दिल्लीत झालेली गारपीट, वा-यानं बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणारे शीत वारे  या प्रमुख घटकांमुळे राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात थेट 10 अंशांची घट झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या चार दिवसांत मुंबईचं कमाल तापमान ३४ वरून थेट २४ अंशावर घसरलंय.

Special Report: अशीही बनवाबनवी, लग्नात थेट नवराच बदलला

First published: February 10, 2019, 9:36 AM IST

ताज्या बातम्या