मुंबईत पुन्हा ढगाळ हवामान; विदर्भात कायम राहणार हुडहुडी

मुंबईत पुन्हा ढगाळ हवामान; विदर्भात कायम राहणार हुडहुडी

विदर्भात आणकी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता असून, ढगाळ हमानामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्याता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर - उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या अनेक भागात परत ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असून, ढगाळ हमानामुळे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्याताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची तीव्र लाट पसरली आहे. ही लाट विदर्भातही आली असून, किमान तापमानात घट झाल्याने सोमवारी नागपूरचा पारा 7.1 अंशापर्यंत खाली आला होता. तर गोंदिया, यवतमाळ येथे 10 अंशांपेक्षा कमी तापमान नोंदलं गेलं. जळगावचाही पारा 9.6 अंशापर्यंत खाली आला होता.

उत्तरेतल्या हिमवर्षावामळे विदर्भात शीत लहर पसरली आहे. नागपूरसह विदर्भातल्या अन्य 10 जिह्यांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मुंबई आणि राज्याच्या काही भागात परत ढगाळ हवामान तयार झालं असल्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्रा, रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे थंडी कायम आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

सोमवारी राजधानी दिल्लीचा पारा 4 अंशापर्यंत खाली आला होता. उत्तरेत आणखी थंडी वाढणार असल्याने महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आणखी घट होणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर कडाक्याच्या थंडीमुळे उत्तरेत सद्या दाट धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. दाट धुक्यामुळे सोमवारी हरियाणा महामार्गावर अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला होता.

सोमवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 21.0

मुंबई (सांताक्रूज) 17.6

अलिबाग 19.8

रत्नागिरी 20.2

पणजी (गोवा) 22.2

डहाणू 17.2

पुणे 13.5

जळगाव 9.6

कोल्हापूर 18.1

महाबळेश्वर 14.5

मालेगाव 12.4

नाशिक 11.2

सांगली 15.2

सातारा 12.5

सोलापूर 17.3

उस्मानाबाद 14.8

औरंगाबाद 12.0

परभणी 12.1

नागपूर 7.1

अकोला 11.4

अमरावती 12.0

बुलडाणा 13.6

ब्रम्हपूरी 9.6

चंद्रपूर 10.6

गोंदिया 8.0

वर्धा 10.8

यवतमाळ 9.2

 VIDEO- काश्मिरचा ‘हॉट स्पॉट’ही गारठला, दल लेकवर बर्फाची चादर

First published: December 24, 2018, 4:50 PM IST

ताज्या बातम्या