मुंबई, पुण्यातही थंडीचा जोर; गारठा आणखी वाढणार

मुंबई, पुण्यातही थंडीचा जोर; गारठा आणखी वाढणार

विदर्भात गारठा कायम असून, 31 डिसेंबरपर्यंत तो आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर - उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांचा प्रभाव आता पश्चिम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. बुधवारी मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात किमान तापमानात घसरण झाली. विदर्भात गारठा कायम असून, 31 डिसेंबरपर्यंत तो आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यात शीत लहर पसरायला सुरुवात झाली आहे. विदर्भात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होत असून, गारठा कायम आहे. बुधवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं. तर नागपूर येथे 10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ही शीत लहर मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पोहोचली असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट कमालीची झाली आहे. मुंबई आणि तिच्या काही उपनगरांमध्ये बुधवारी चांगलाच गारठा वाढला होता. मुंबईचं किमान तापमान 20.5 (कुलाबा) आणि 17.4 (सांताक्रूझ) असं नोंदलं गेलं. पुण्यामध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान होतं. पुण्यात 14 तर महाबळेश्वरचं तापमान 15.6 अंश सेल्सियस होतं. नाशिकमध्ये 12.2 अंश तर औरंगाबादमध्ये 13.3 अंश तापमानाची नोंद झाली.

 VIDEO : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोतांच्या गाडीवर भिरकावले टोमॅटो

First published: December 26, 2018, 8:54 PM IST

ताज्या बातम्या