मुंबई, 20 डिसेंबर : करावे तसे भरावी ही म्हण आपण बरेचदा ऐकली असेल. आपण दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की आपलं वाईट होतं. याआधी एका माणसाचा प्राण्याला लाथ मारताना व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि आता एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की लहान मुलगा कोंबड्याला त्रास देत आहे. त्याला मारण्याचा हुसकवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. चिडलेली कोंबडा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी अंगावर धावून जातो. कोंबडा पाठलाग करतो ते पाहून चिमुकला पळत सुटतो आणि खाली पडतो.
हा व्हिडीओ नीट पाहिला तर आपल्या लक्षात येईल कोंबडा त्याला डिवचण्यासाठी येत असताना एका काठीवर चुकून त्याचे पाय पडतात आणि हा चिमुकला त्या काठीला अडकून पडतो. सुरुवातीला पाहिलं तर हे कोंबड्यानं त्याला अद्दल शिकवण्यासाठी केलं असावं असं वाटतं पण हा व्हिडीओ पुन्हा नीट पाहिला तर करावे तसे भरावे या म्हणीचा प्रत्यत येतो आणि कोंबडा मुद्दमुन वागला नाही ते अनावधानानं झालं असावं हे समजतं.
7 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या आधी एका माणसानं अस्वलाला लाथ मारायला पाय वर केला आणि खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. कर्मा इज बॅक अशा कॅप्शननं हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.