Home /News /news /

स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण, CM योगी आणि प्रियांका गांधी यांच्यात लेटर वॉर

स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण, CM योगी आणि प्रियांका गांधी यांच्यात लेटर वॉर

उत्तर प्रदेशात स्थलांतरित कामगारांच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू

    नवी दिल्ली, 19 मे : काँग्रेस सरचिटणीस, उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात पत्रांद्वारे वाद चांगलाच पेटल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून काँग्रेसच्या वतीने बसेसचीची यादी देण्यात आलेली होती. त्यामध्ये आटो मोटरसायकल आणि बसचे क्रमांक असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारनं केला होता. पण दुसरीकडे काँग्रेसने दावा केला की, उत्तर प्रदेश सरकार ही बनावट यादी प्रसारित करीत असून प्रथम आग्रा इथं बसेस काढण्याकरिता सांगितलं होतं. दोन तासातच हजार बसेस या गाजियाबाद इथे पाठवून द्यावा अशी सूचना उत्तर सरकारने केली आहे त्यामुळे जनतेला माहित आहे कोण राजकारण करीत आहे असं काँग्रेसच्या एका नेत्यानं स्पष्ट केलं आहे. खरंतर, प्रियंका गांधी वाड्रा यांच्या 1000 बसेसची यादी पाठवल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांना पुन्हा एक नवीन पत्र पाठवलं आहे. रात्री उशिरा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीशकुमार अवस्थी यांनी प्रियंका वाड्रा यांच्या खासगी सचिवांना पत्र लिहिलं. सर्व बस वृंदावन योजना सेक्टर -15 आणि 16 लखनऊ इथे सकाळी दहा वाजता उभ्या केल्या पाहिजेत. सर्व बसेसच्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, ऑपरेटरचे ओळखपत्र व बसचे फिटनेस प्रमाणपत्र जिल्हा दंडाधिकारी लखनऊ यांना द्या. तेव्हाच परवानगी पत्र देण्यात येईल. असं या पत्रात म्हटलं होतं. भारताच्या लिपूलेख, कलापानी क्षेत्रावर नेपाळचा दावा; तयार केला नवा नकाशा यावर प्रियांका वाड्रांचे खासगी सचिव संदीप सिंग यांनीही पत्राद्वारे प्रत्यूत्तर दिलं की, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी गाझियाबाद आणि गाझिपूर सीमेवरुन आणि एनसीआरमध्ये अडकलेल्या प्रवासी कामगार व कामगारांना घरी आणण्यासाठी 500 बसेस नोएडा येथून पाठवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडे परवानगी मागितली होती पण या संदर्भात, आम्हाला बस व ड्रायव्हर्सचा तपशील विचारला गेला, जो ईमेलद्वारे पाठवला गेला होता. संशयामुळे प्रेमाचं नातं कधी दिसलंच नाही, हैवानासारखी केली पत्नीची हत्या पण असं असतानाही आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं की, आम्ही वारंवार बसची यादी मागत आहोत. पण ती देण्यात आली नाही. त्यानंतर सोमवारी रात्री 11.40 वाजता उत्तर प्रदेश सरकारकडून एक पत्र आलं, ज्यामध्ये 1000 बसची सर्व कागदपत्रे सकाळी 10 वाजता लखनऊमध्ये देण्यात आली आहेत. प्रियंका वाड्रा यांचे खासगी सचिव संदीप सिंह पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या सीमेवरील नोंदणी केंद्रांवर हजारो लोक जमले आहेत, अशा परिस्थितीत लखनऊला मार्केट बस पाठवणं केवळ वेळ आणि संसाधनांचा अपव्यय नसून अमानवीय आहे. आम्ही आमच्या बाजूने उभे आहोत आणि संकटात स्थलांतरित कामगार आणि कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गाझियाबाद व गाझीपूर सीमेवर बस चालवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. आनंदाने झेलण्यासाठी वर फेकलेलं बाळ थेट फरशीवर आदळलं, जागीच सोडला जीव संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या