पंढरीत 12 लाख भाविक दाखल, पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

पंढरीत 12 लाख भाविक दाखल,  पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

माऊलींचा पालखी सोहळा अखेर पंढरीत दाखल झालाय. प्रशासनाच्या आश्वासनानंतर वारकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय

  • Share this:

04 जुलै :   'विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी', अशी विठ्ठलनामाने दुमदुमणारी पंढरी आज लाखो नेत्रांनी पाहिली. चंद्रभागेत स्नान करून विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर 'याजसाठी केला होता अट्टाहास', अशी कृतार्थ भावना वारकर्‍यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात अंदाजे 12  लाख दाखल झालेल्या वारकर्‍यांनी अवघी पंढरी आज फुलून गेली.

अवघे गर्जे पंढरपूर....विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी एकोणीस दिवसांची वारी करुन राज्यभरातले भाविक पंढरपुरात दाखल झाले. अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरानं दुमदुमलीय. प्रत्येक रस्त्यावर वारकर्‍यांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. चंद्रभागेच्या तीरावर तर वैष्णवांचा महासागर लोटलाय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सपत्निक पांडुरंगाच्या चरणी रूजू झाले. त्यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा झाली. श्रीविठ्ठलाचं दर्शन घेत त्यांनी त्याच्यावर अभिषेक केला. यावेळी मानाचे वारकरी म्हणून  बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंधखेड तालुक्यातल्या उत्तमराव मेरत  आणि त्यांच्या पत्नी अनुसया यांना मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. महापूजेच्या आधी विठ्ठल रखुमाईच्या मूतीर्ंना भरजरी वस्त्रं चढवण्यात आली. आधीच आरस्पानी असलेल्या विठुरायाचं तेज यामुळे अधिकच खुललं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 11:14 PM IST

ताज्या बातम्या