मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत पाहणार 'Tanhaji'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत पाहणार 'Tanhaji'

शिवसेनेच्या नगरसेवकांनाही मुख्यमंत्री ठाकरेंसोबत चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सिनेमागृहाच्या बाहेर विशेष तयारी करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेता अजय देवगण आज तान्हाजी चित्रपट पाहणार आहेत. महापालिकेच्या आयुक्तांनी प्लाझा सिनेमा इथं राजस्थान आणि इतर राज्यातील वन्यजीवनासंदर्भात एक प्रेझेंटेशनही आयोजित केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनाही मुख्यमंत्री ठाकरेंसोबत चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सिनेमागृहाच्या बाहेर विशेष तयारी करण्यात आली आहे. तर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील सिटी सेंटर मॉलमध्ये तान्हाजी सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून बारे पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फी काढला. शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारा तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तान्हाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत केली आहे.

'तान्हाजीचा इतिहास खरा नाही', सैफ अली खानच्या वक्तव्यानं खळबळ

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे. वॉरियर (Tanhaji: Unsung Warrior)' बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असतानाच सैफनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर तान्हाजीच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. 'चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अर्धवट आहे. तो चुकीचा आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर मी भूमिकेच्या प्रेमात पडलो होतो, त्यामुळे त्यावर ठाम मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या पण मला भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे मी काही बोलू शकलो नाही.' सैफ अली खाननं एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.

इतर बातम्या - शिवरायांचा संदेश देत राज ठाकरेंच्या आवाजात मनसेकडून VIDEO प्रसिद्ध

इतक्या दिवसांनंतर सैफ अली खानंनं आपलं मौन सोडलं खरं मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काहीदिवसांपासून ज्या प्रश्नापासून सैफ अली खान यांनी मौन पाळलं होतं. त्याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिलं आहे. त्यासोबतच सध्या देशात सुरू असलेल्या घटनांवर त्यांनी आपलं मत मांडलं. सध्या देशात जे सुरू आहे त्यासंदर्भात सैफनं खंत व्यक्त केली.

‘तानाजी’करमुक्त करा, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्रातून केली होती. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले.

इतर बातम्या - राशीभविष्य 21 जानेवारी: कर्क आणि वृश्चिक राशीला होईल आर्थिक लाभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने केली आहे.

First published: January 21, 2020, 7:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या