लॉकडाऊन होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सविस्तरपणे सांगितली भूमिका

लॉकडाऊन होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सविस्तरपणे सांगितली भूमिका

Uddhav Thackeary Live Update: 'कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट आली आहे की नाही हे 10-15 दिवसांत कळेल.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागल्याने शासन, प्रशासनासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचीही माहिती दिली.

'कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट आली आहे की नाही हे 10-15 दिवसांत कळेल. पाश्चिमात्य देशांत कोरोना रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. लॉकडाऊन हे कोरोनावरील उत्तर असेल नसेल पण साखळी तोडण्यासाठीचा तो एक पर्याय नक्कीच आहे. आपल्यालाही सर्वांना आता बंधन पाळावंच लागेल. आपण गाफील राहिलो तर आपल्याला पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागेल,' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात राज्यात निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत.

'लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे ज्या कोरोना वॉरियर्सने अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी ती घ्यावी,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे :

-कोरोना काळात मी आपल्याशी संवाद करत होतो, आपण मला कुटुंबातील एक सदस्य मानलं

-तुमच्या आशीर्वादानेच मी आणि आपण ही लढाई लढायला घेतली

-आता लसीकरणाची सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रात आपण 9 लाखाच्या आसपास कोरोना वॉरिअर्सना हे लसीकरण सुरू केलं

-मास्क न घालणाऱ्यांबाबत आपण कठोर कारवाई करत आहोत

-महाराष्ट्र कोरोना विरोधातील लढाई लढतोय

-कोविड योद्ध्यांनी लसीकरण करुन घ्यावं

-बंधनं कोणालाही आवडत नाहीत

-गेल्या वर्षातली परिस्थिती भयंकर होती

-आपण मला परिवारातला सदस्य मानलंत

-कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला आपण पुढे नेतोय

-घरामध्ये बंद करुन ठेवणं कुणालाही आवडणार नाही

-राज्यात जवळपास 9 लाख नागरिकांचं लसीकरण

-लसीकरणाचे कोणतेही घातक साईड इफेक्ट्स नाहीत

-आणखी एक ते दोन कंपन्या लस उपलब्ध करुन देणार, त्यानंतर जनतेसाठी लसीकरणाचा कार्यक्रम खुला करणार

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

15 फेब्रुवारी 3365

16 फेब्रुवारी 3663

17 फेब्रुवारी 4787

18 फेब्रुवारी 5427

19 फेब्रुवारी 6112

20 फेब्रुवारी 6281

21 फेब्रुवारी 6971

First published: February 21, 2021, 7:28 PM IST

ताज्या बातम्या