Home /News /news /

अधिवेशनात कोकणासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर कोरोनाबद्दल केलं नागिरकांना निवेदन

अधिवेशनात कोकणासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर कोरोनाबद्दल केलं नागिरकांना निवेदन

'मुंबई, पुणे, नागपूर इथे चाचणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. आपण भयभीत न होता या संकटाचा मुकाबला केला पाहिजे.'

    मुंबई, 05 मार्च : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्टन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरसवर भरयभीत होऊ नका असं नागरिकांना निवेदन दिलं. ते म्हणाले की, 'दर दिवसाआड मी बैठका घेत आहे. मागील महिनाभर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबई, पुणे, नागपूर इथे चाचणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे. आपण भयभीत न होता या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्यामुळे करू नये त्या चुका आपण लवकर करतो. मास्कचा पुरेसा साठा केला आहे.' 'कोरोना व्हायरसचं संकट होळीत जळून खाक व्हावं' ते पुढे म्हणाले की, 'मुंबईतील रिकामं असलेलं सेव्हन हिल्स हॉस्पीटल यासाठी वापरता येईल का ते बघूया. विमानतळावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि विशिष्ट कपडे पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांची जनजागृती करण्यासाठी जाहीराती करण्याच्या सूचना केल्या आहेत. बस स्थानके, रेल्वे स्थानकावर याची माहिती दिली जाईल. शासन पूर्ण सक्षम आहे. महाराष्ट्रात भीतीचं वातावरण नाही. पंतप्रधानांनी होळी साजरी न करण्याचं ठरवलं आहे. स्वाईन फ्लू आला होता, तेव्हा दहिहंडी उत्सव होता, तो सर्व पक्षांनी रद्द केला होता. कोरोना व्हायरसचं संकट होळीत जळून खाक व्हावं. आवश्यकता नसेल तिथे गर्दी करू नका. पुढील आठ दिवस काळजीचे आहेत. होळीही मर्यादीत स्वरुपात करावी. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी सुरू केली आहे' हे वाचा - रतनलाल यांच्यावर हल्ला झाल्याचा VIDEO आला समोर, दिल्ली हिंसाचाराचं भयानक दृष्य चिपी विमानतळ सुरु करणार दरम्यान, नाणारचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे यांचं उत्तर दिलं. यावर ते म्हणाले की 'कोकणकिनारपट्टीवर जर प्रकल्प आणायचे असतील तर जे वैभव आहे ते टिकवलं पाहिजं. कृत्रिम प्रकल्पासाठी निसर्गाचं नुकसान नको. एक मेपर्यंत चिपी विमानतळ सुरू करणार असून अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. फक्त बोलाची कढी बोलाचा भात नाही प्रत्यक्ष काम करत आहोत. विकास करताना आपल्याकडे काय आहे हे पाहायला हवं. कोकणचा काॅलिफोर्निया करायचं सांगितलं पण अजून काही झालं नाही. कुठलीही पाणी योजना रद्द किंवा थांबवलेली नाही.' हे वाचा - दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला मोठा पुरावा
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या