हे बजेट ऐतिहासिक आणि अभूतपूर्व- मुख्यमंत्री

हे बजेट ऐतिहासिक आणि अभूतपूर्व- मुख्यमंत्री

हे बजेट ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

  • Share this:

01 फेब्रुवारी, मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरूण जेटली आणि पंतप्रधानांचे जाहीर आभार मानलेत. शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभावाचं आश्वासन देऊन जेटलींनी बळीराजाला मोठा दिलाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. हे बजेट ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच गोरगरिबांसाठी 5 लाखांपर्यंतचा आरोग्य खर्च मोफत देण्याचं आश्वासनाचा सामान्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. मुद्रा योजनेचाही युवकांना मोठा फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुंबई लोकलसाठी 40 हजार कोटींची तरतूद करून केंद्र सरकारने मुंबईकरांना मोठा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2018 02:47 PM IST

ताज्या बातम्या