मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 2 दिवसांत होणार खातेवाटप

या विस्तारांनंतर आता दोन ते तीन दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा तीन मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता दोन ते तीन दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं यावर प्रश्न विचारला असता, त्यांना जे देणार आहोत ते आम्ही देणार त्यामुळे ते नाराज होणार नाहीत. तर माझ्याकडे कोणाचीही नाराजी आली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. हा शपथविधी राज्यपालांच्या इच्छेनुसार झाला आहे. त्यामुळे नंतर कोणताही वाद नको असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तर शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

शपथ नियमांनुसार व्हावी ही राज्यपालांची इच्छा

- तिन्ही मित्रपक्षांप्रमाणे खातेवाटप पूर्ण करण्यात आला आहे

- महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही पण इतर लोक वाद उकरून काढत आहेत

- मित्रपक्षांना आम्ही जे देणार ते देणार आहोत

- विरोधी पक्षांकडून महाविकासआघाडीची बदनामी केली जातेय

- तीन मित्र पक्षांचं सरकार असल्यामुळे सगळ्यांवर मर्यादा आहेत

- माझ्याकडे कोणाचीही नाराजी आलेली नाही

- शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती केली आहे

- नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी नवी योजणा आणू

- महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात कठोर कायदा आणू. त्यासाठी योग्य तो अभ्यास सुरू आहे.

असा पार पडला महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा

दरम्यान, राजभवनाच्या पांगणात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची तर परळीचे आमदार धनंजय मुंडे, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांचे एकूण 36 मंत्री शपथ घेतली. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित केले आहे.

हे आमदार झाले 'मंत्री'...

>शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> डॉ. विश्वजीत कदम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> असलम शेख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते सतेज पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेना नेते संदीपान भुमरे यांचा शपथविधी

> जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे यवतमाळ येथील आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगी येथील आमदार राजेश टोपे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे अणुशक्तीनगर येथील आमदार नवाब मलिक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंदखेड राजा येथील आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसच्या धारावी येथील आमदार वर्षा गायकवाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे काटोल मतदार संघाचे आमदार अनिल देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading