ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही- मुख्यमंत्री

ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प लादणार नाही- मुख्यमंत्री

रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असेल तर आम्ही तो लोकांवर लादणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी वर्षावर जाऊन याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नाणारचे प्रकल्पग्रस्तही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते.

  • Share this:

15 फेब्रुवारी, मुंबई : रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असेल तर आम्ही तो लोकांवर लादणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी वर्षावर जाऊन याप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नाणारचे प्रकल्पग्रस्तही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीही यावेळी शिवसेना ग्रामस्थांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट करत या प्रकल्पाला आमचाही विरोध असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

यावेळी नाणार ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठेही दिले. प्रकल्प मंजुरीसाठी 70 टक्के स्थानिकांची सहमती लागते मात्र आज नाणारमधल्या 78 टक्के स्थानिकांनी असहमती पत्र मुख्यमंत्र्यांना सुपूर्त केले. त्यामुळे नाणार प्रकल्प होणार नाही, असा दावा सेनेच्यावतीने करण्यात आला. तर नाणारप्रश्नी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली, हा राणेंच्या राजकारणाचा विजय असल्याचा दावा नितेश राणे यांनी केलाय.

दरम्यान, वाडवन बंदराला शिवशाहीचं सरकार असतांना लोकांनी विरोध केला, तेव्हाही आम्ही तो प्रकल्प रद्द केल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी यावेळी करून दिली. विकासाच्या नावाखाली कोकणचं वैभव मरू देणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 11:22 PM IST

ताज्या बातम्या