S M L

बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन जातीवाद वाढवताहेत, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

भीमा कोरेगावला जी काही घटना घडली त्याची चौकशीचे आदेश दिले आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात आणि जातीवादाचे मुद्दे काढतात, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिग्नेश मेवाणी यांचं नाव न घेता केलाय.

Chandrakant Funde | Updated On: Jan 3, 2018 06:02 PM IST

बाहेरचे लोक महाराष्ट्रात येऊन जातीवाद वाढवताहेत, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

03 जानेवारी, मुंबई : भीमा कोरेगावला जी काही घटना घडली त्याची चौकशीचे आदेश दिले आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात आणि जातीवादाचे मुद्दे काढतात, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिग्नेश मेवाणी यांचं नाव न घेता केलाय.

मुख्यमंत्री म्हणाले, ''ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत तेच असं तणावपूर्ण वातावरण निर्माण करतात. पण आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता याला बळी पडणार नाही. विचारांच्या संकुचितपणामुळे काही लोक परस्परविरोधी उभे ठाकलेत. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनीच हा अकारण वाद निर्माण केलाय. आज लोकांना तणावमुक्ती आणि विकास हवाय. विकास हा शांततेतच शक्य आहे. जी घटना झाली ती दुर्दैवीच आहे. पण म्हणून काही त्या घटनेचा राजकीय लाभ उकळण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि तशी संधी माध्यमांनीही कुणाला देऊ नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 05:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close