News18 Lokmat

15 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीचे 6.5 हजार कोटी जमा- मुख्यमंत्री

राज्यातल्या 15 लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर साडेसहा हजार कोटी रुपये जमा केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला, यावेळी एका ऊस उत्पादकाने विचारलेल्या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 25, 2017 12:34 PM IST

15 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीचे 6.5 हजार कोटी जमा- मुख्यमंत्री

25 नोव्हेंबर, कोल्हापूर : राज्यातल्या 15 लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर साडेसहा हजार कोटी रुपये जमा केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला, यावेळी एका ऊस उत्पादकाने विचारलेल्या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

येत्या 10 ते 12 दिवसात अजून दहा लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असून अर्थव्यवस्था मजबूत झाली तर कर्जमाफीचा हा प्रश्‍न नक्कीच सुटेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या कर्जमाफीत अनेकांनी आपलं चांगभलं करून घेतल्याची जाहीर टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

बँकांनी घोळ घातल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचा आरोप होतोय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...