मुख्यमंत्री बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीला, पंकजा मुंडेही उपस्थित

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. जयदत्त क्षीरसागर हे छगन भुजबळ गटाचे मानले जातात. पण राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना बळ दिल्याने जयदत्त क्षीरसागर काहीसे नाराज होते.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 01:06 PM IST

मुख्यमंत्री बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीला, पंकजा मुंडेही उपस्थित

01 नोव्हेंबर, बीड : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. जयदत्त क्षीरसागर हे छगन भुजबळ गटाचे मानले जातात. पण राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना बळ दिल्याने जयदत्त क्षीरसागर काहीसे नाराज होते. बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना काटशह देण्यासाठीच पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्यापाठोपाठ जयदत्त क्षीरसागर यांनाही भाजपात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय.

सुरेश धस यांनीही यापूर्वीच राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपला झेडपीत पाठिंबा दिलाय. मध्यंतरीही सुरेश धस यांनी जयदत्त क्षीरसागर यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतरच जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या वावड्या उठू लागल्या होत्या, अशातच आज मुख्यमंत्री आणि जयदत्त क्षीरसागर यांनी मुंबई ते बीड एकत्र प्रवास केला एवढंच नाहीतर पंकजा मुंडे मुख्यमंत्री यांना घेऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या घरीही गेल्यात.

या भेटीमुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या राजकीय चर्चेने पुन्हा जोर धरलाय. दरम्यान, नबाब मलिक यांनी मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचा दावा करत जयजत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...