राज्यातील रखडलेले 107 सिंचन प्रकल्प मार्गी लागणार -मुख्यमंत्री

राज्यातील रखडलेले 107 सिंचन प्रकल्प मार्गी लागणार -मुख्यमंत्री

राज्यातील रखडलेल्या 107 सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार 10 हजार कोटींचं अर्थसहाय्य करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत यासंबंधीची घोषणा केली.

  • Share this:

14 नोव्हेंबर, नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या 107 सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार 10 हजार कोटींचं अर्थसहाय्य करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत यासंबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्लीत नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात केंद्र सरकारला राज्यातल्या रखडलेल्या 107 सिंचन प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली.

यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्ठमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन राज्यातल्या रखडलेल्या 107 सिंचन प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याची विनंती त्यांना केली. यापूर्वीच अर्थमंत्र्यांनी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार केंद्र सरकार लवकरच याबद्दलची औपचारिक घोषणा करणार आहे.

साधारण 10 हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकार या प्रकल्पांसाठी करण्याची शक्यता आहे. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश इथल्या गेले अनेक वर्षे रखडलेल्या 107 सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. हे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले तर राज्यातल्या दुष्काळी तालुक्यांमधील कृषी सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 07:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading