Home /News /news /

मुख्यमंत्री फडणवीस आज अण्णा हजारेंना भेटणार

मुख्यमंत्री फडणवीस आज अण्णा हजारेंना भेटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसांच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर असून ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेणार आहेत. ग्रामसुरक्षा दल आणि सौरउर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येत आहेत

पुढे वाचा ...
मुंबई, 04 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसांच्या राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर असून ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेणार आहेत. ग्रामसुरक्षा दल आणि सौरउर्जा प्रकल्प यांचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगण सिद्धीला येत आहेत. या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्रात स्थापन झालेल्या ग्राम सुरक्षा दलांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. आज दुपारी मुख्यमंत्री आणि अण्णांची भेट होणार आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंनी लोकपालच्या मुद्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर अण्णांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीचा आजचा दौरा आखल्याचं बोललं जातंय. अर्थात या भेटीमागचं खरं कारण मात्र, अजून समजू शकलेलं नाही.
First published:

Tags: अण्णा हजारे, मुख्यमंत्री

पुढील बातम्या