S M L

कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांची एकजूट

एच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Ajay Kautikwar | Updated On: May 23, 2018 04:49 PM IST

कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांची एकजूट

बंगळुरू,ता.23 मे: एच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसच्या वाटयाला 22 मंत्रिपदं येणार आहेत तर जेडीएसच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासहीत 12 मंत्रिपदं येणार आहेत.

बुधवारी सायंकाळी शपथविधी होणार असून ते गुरूवारी आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत. शपथविधीचं निमित्त साधून कुमारस्वामींनी देशभरातल्या भाजप विरोधी नेत्यांना शपथविधीसाठी निमंत्रित केलं असून अनेक दिग्गज त्यासाठी एकत्र येणार आहेत. यातून मोदीविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न होणार आहे.

शपथविधीला कोण आहे उपस्थित

राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2018 04:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close