जेव्हा मुख्यमंत्री आपल्याच लठ्ठपणावर बोलतात...

जेव्हा मुख्यमंत्री आपल्याच लठ्ठपणावर बोलतात...

"लहान मुलांमधील लठ्ठपणा काय असतो याचं उदाहरण मी सुद्धा आहे. मी लहानपणी लठ्ठ होतो, आताही आहे"

  • Share this:

16 नोव्हेंबर : "मी सहज एक कागदाचा गोळा दिविजाला फेकून मारला तर तिने मला मोदींकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती"असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. तसंच त्यांनी आपण लठ्ठ असल्याची कबुलीही दिली.

पुण्यात रोटरी क्लबने आज लहान मुलांमधील लठ्ठपणाची अर्थात ओबेसिटीची वाढती समस्या लक्षात घेऊन ती कमी करण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. लहान मुलांमधील लठ्ठपणा काय असतो याचं उदाहरण मी सुद्धा आहे. मी लहानपणी लठ्ठ होतो, आताही आहे, मध्यंतरी कमी झालो, परत वजन वाढलं, हे असंच सुरू आहे अशी कबुली देऊन मुख्यमंत्र्यांनी एकच हशा पिकवली. तसंच आताही लठ्ठच असल्याचं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय.

लहानपणी ओबेसिटी त्याची लक्षण किंवा योग्य आहार याबाबत आतासारखी जागरूक स्थिती नव्हती मात्र आता परिस्थिती बदलल्याच सांगत मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करावे लागणारं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

तसंच स्वच्छता राखणं आपलं कर्तव्य आहे. पण घरी असताना मी सहज एक कागदी नॅपकिन गोळा करून दिविजाच्या दिशेनं फेकला. तर तिने मला पंतप्रधान मोदींकडे तक्रार करण्याची धमकी दिली, आता तुम्हीही कचरा करू नका असा सल्ला देत आपल्यावरील विनोदाचा किस्साच मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

पूर्वीच्या मैदानी खेळांच रूपांतर गॅझेट गेम्स मध्ये होणं ही शोकांतिका असल्याचं मत ही त्यांनी व्यक्त केलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...