मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी अपयशी, तूर खरेदीला वाढ नाहीच !

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी अपयशी, तूर खरेदीला वाढ नाहीच !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी अपयशी ठरली असून तूर खरेदीचा कालावधी वाढवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिलाय.

  • Share this:

24 एप्रिल : राज्यात तूर खरेदी होत नसल्यामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी अपयशी ठरली असून तूर खरेदीचा कालावधी वाढवण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिलाय.

वर्धा, अकोला, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये तूर शेतकरी संकटात सापडलाय. तुरीला भाव नसल्यानं मातीमोल किंमतीमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकावी लागतीये.

केंद्र सरकारने 22 एप्रिल 2017 पर्यंत तूर खरेदीची मुभा दिली होती. आता ही डेडलाईन संपली. तूर खरेदीचा कालावधी वाढावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली गाठली. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. मात्र तूर खरेदीचा कालावधी वाढवू शकत नाही असं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.

राज्य सरकारच्या विनंतीवर केंद्राने सतत वाढ दिली होती. पण 22 एप्रिलला ती बंद करण्यात आलीये. पण 22 एप्रिलपर्यंत तूर केंद्रावर ज्या तूर असतील ती खरेदी करता येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तुरीवर आयात कर 10 टक्क्यावरुन 25 टक्के करावा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पासवान यांच्याकडे केली.

तसंच तुरीची विक्रमी उत्पादन आल्यावर काय करायचं यावर कायम स्वरुपी तोडगा काढावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पासवान यांच्याकडे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 02:48 PM IST

ताज्या बातम्या