मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

  • Share this:

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं जात आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.  आजच मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्रातल्या खासदारांसोबतही दिल्लीत बैठक होणार आहे.

राज्यात मराठा आंदोलनावरुन वातावरण तापलेलं असताना सरकारनं आरक्षणासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात. नवी दिल्लीत आज संध्याकाळी महत्वाची बैठक पार पडतीये. भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा हजर असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला मोर्चेकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणीस दिल्लीत पोहोचले आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

रविवारी सह्याद्री वाहिनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला आवाहन केलं होतं. मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. मराठा आरक्षणासाठी सरकार देण्यासाठी तयार आहे मात्र सुप्रीम कोर्टात न्यायिक बाजू टिकवून ठेवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास आयोगाला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. हा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलावले जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

तसंच मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार आहे. ज्यामुळे कोर्टात सरकाराला बाजू लावून धरता येईल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.

(संग्रहित फोटो)

हेही वाचा...

VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली

First published: August 6, 2018, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading