'शेतकऱ्यांशी कर्जावर चर्चा', मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती

'शेतकऱ्यांशी कर्जावर चर्चा', मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त करण्यात आलाय. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

  • Share this:

09 जून : कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त करण्यात आलाय. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.

शेतकरी संपामुळे अवघा देश ढवळून निघाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर गेलंय. त्यामुळेच शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना केलीये.

या मंत्रिगटामध्ये राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य असतील.

हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी 31 आॅक्टोबरआधी कर्जमाफीची मोठी घोषणा करणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता फडणवीस सरकारमध्ये हालचालींना वेग आलाय.

First published: June 9, 2017, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading