'50 वर्ष काँग्रेसने एप्रिल फूल बनवलं', मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 मुद्दे

'50 वर्ष काँग्रेसने एप्रिल फूल बनवलं', मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 मुद्दे

वर्ध्यामध्ये आयोजित या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पाहूयात त्यांच्या भाषणातेल 10 मुद्दे...

  • Share this:

वर्धा, 01 एप्रिल : काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. सोमवारी वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. वर्ध्यामध्ये आयोजित या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पाहूयात त्यांच्या भाषणातेल 10 मुद्दे...

- 2014 मध्ये लोकसभेची पहिली सभा वर्ध्यामध्ये घेतली होती. या सभेनंतर गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसला विसर्जित केलं.

- जनतेनं काँग्रेसला लोकसभा, विधानसभा, जिल्हा पंचायत, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतमध्ये देखील विसर्जित केलं.

- वर्ध्याच्या भूमिने मागच्या वर्षीही भारतीय जनता पक्षाला निवडणून आणलं. यार्षीही आणणार

- विदर्भाच्या सुपूत्रा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

- जे काँग्रेसने 15 वर्षात दिलं नाही के भाजपने 4 वर्षात विदर्भाला दिलं

- काही देशांमध्ये 1 एप्रिल, एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. पण या देशामध्ये एका पक्षाने 50 वर्ष देशाला एप्रिल फूल बनवलं.

- पण विसरू नका ही भारताची जनता एप्रिल फूल बनणार नाही

- मोदींना हरवण्यासाठी या काँग्रेस पक्षाने तब्बल 56 पक्षांशी महाआघाडी केली. पण देश चालण्यासाठी 56 पक्ष नाही तर 56 इंचाची छाती लागते.

-   56 इंचाची छाती फक्त नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे.

- सगळा देश बोलतो हा आता मोदींचं राज्य आहे. भारतावर कोणीही वाईट नजर टाकू शकत नाही.

- मोदींच्या नेतृत्त्वात देशाची प्रगती झाली आहे

'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'

First published: April 1, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading