अमित शहांच्या रथातूनच निघणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, असा आहे रथ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत याच रथातून संपूर्ण 25 दिवस प्रवास करणार आहे. यात्रेसाठी एकूण 2 रथांची निर्मिती करण्यात आली असून एक रथ पर्यायी म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केलेत. या यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा येण्याची शक्यता असून समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावं असा भाजपचा प्रयत्न आहे.

या यात्रेत जो रथ वापरण्यात येणार आहे त्याला मुंबईत अंतिम रूप देण्यात आलं आहे. हा रथ येत्या 2 दिवसांत अमरावती जवळच्या मोझरीत दाखल होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून ही यात्रा प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी सगळं मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असून नंतर प्रत्येक दिवसासाठी एका मंत्र्यांला प्रभारी करण्यात आलं आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र इथे 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा असणार आहे. तर 16 ते 31 ऑगस्ट असा दुसरा टप्पा असणार आहे. 14 जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान 57 विधानसभा मतदार संघातून 1639 किमींचा प्रवास मुख्यमंत्री करणार आहेत. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार इथं होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र इथे 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा असणार आहे. तर 16 ते 31 ऑगस्ट असा दुसरा टप्पा असणार आहे. 14 जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान 57 विधानसभा मतदार संघातून 1639 किमींचा प्रवास मुख्यमंत्री करणार आहेत. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार इथं होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत याच रथातून संपूर्ण 25 दिवस प्रवास करणार आहे. यात्रेसाठी एकूण 2 रथांची निर्मिती करण्यात आली असून एक रथ पर्यायी म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत याच रथातून संपूर्ण 25 दिवस प्रवास करणार आहे. यात्रेसाठी एकूण 2 रथांची निर्मिती करण्यात आली असून एक रथ पर्यायी म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.

गेल्या 6 वर्षांत पक्षाच्या नेत्यांनी वापरलेल्या रथांचाच वापर यासाठी करण्यात आलाय. त्याची दुरुस्ती मुंबईत करण्यात आलीय. मध्यप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात वापरले गेलेले रथ यासाठी वापरण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही हा रथ वापरलेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या