मुंबई, 16 जुलै : वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. 'आम्ही कागदी वाघ नाही आहोत. मात्र, काही कागदी वाघ आहेत', असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचंही नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. सध्या पाऊस आणि रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे राजकीय वर्तुळात एकमेकांवर तोफा डागण्याचं काम सुरू आहे. त्यात काल पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेनेवर जोरदार टीका केली.
भाजपाची पूर्व विदर्भातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक कोराडी येथे पार पडली. यावेळी मुंख्यमंत्री बोलत होते. 'आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट' असा आहे. असं म्हणत त्यांनी भाजपची वाहवाह केली.
आमचा पक्ष वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा नाही. पण काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा...
...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम
'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग