युती नाही, 'या' कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला फोन

बेस्ट संपामध्ये शिवसेना अडचणीत असतानाही भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य न करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 02:18 PM IST

युती नाही, 'या' कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला फोन

मुंबई, 14 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. त्यांनी बेस्ट कामगारांच्या संपासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे. पण मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त भाजपा नेते मात्र शांत आहे.

बेस्ट संपामध्ये शिवसेना अडचणीत असतानाही भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य न करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत युतीची चर्चा अर्धवट असल्यानं बेस्ट संपाबाबत भाजपचं हातावर घडी तोंडावर बोट असचं म्हणावं लागेल.

आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेनं आता सिनेमा डिप्लोमसी सुरू केली आहे. आज ‘ठाकरे’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते सलमान खान आणि संजय दत्तही उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी सामना किंवा शिवसेनेने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली नाही.

Loading...

भाजपच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. युतीचा निर्णय मुंबईत होईल असंही ते म्हणाले होते.

दोन्ही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून जोमाने कामाला सुरूवातही केलीय. त्याचंही गणित युतीवर अवलंबून असल्याने युती झाली तर आघाडीलाही आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत. आता ठाकरे सिनेमाच्या निमित्तानं भाजप-शिवसेनेची सिनेमा डिप्लोमसी सुरू झाल्याने युती होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...