सागर सुरवसे, प्रतिनिधी
सोलापूर, 10 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'सुशीलकुमार शिंदेंनी आम्हाला सांगावं की, हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे?' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुशीलकुमार शिंदेंवर टीका केली आहे.
अक्कलकोटमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
'राहुल गांधींच्या पंजोबापासून देशातली गरिबी हाटवण्याचं काम सुरू आहे. पण ती अद्याप हटलेली नाही. काँग्रेसवाल्यांना योजना माहिती नाही, पैसा कोठून आणणार हे माहीती नाही आणि योजना जाहीर करतात.' अशी टीकाही फडणवीसांनी केली.
'अंडी विकण्याचा धंदा राहुल गांधींच्या माध्यमातून होतोय. सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस सरकारने दहशतवादाविरोधात काय केलं? तर काँग्रेसने केवळ निषेध व्यक्त करण्याचं काम करते.' असं म्हणत या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेसने खंडू ने बंडूला मारायचं असं काम केलं. आम्हाला पुरावे मागणाऱ्यांना माझं सांगणं आहे की, आधी पुरावे मागितले असते आम्ही जे रॉकेट सोडलं त्याबरोबर काँग्रेसचा नेताही सोडला असता.' अशा कठोर शब्दात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर प्रहार केला.
यााधाही 'काँग्रेसचा जाहीरनामा हा जैश-ए-मोहम्मदचा जाहीरनामा आहे का?' असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांना केला होता. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : 'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'
लोकसभा निवडणूक 2019
लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.
11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम
18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी
लोकसभा निवडणूक 2014
महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.
महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल
एकूण जागा 48
भाजप 23
सेना 18
राष्ट्रवादी काँग्रेस 4
काँग्रेस 2
स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत