News18 Lokmat

लग्न दुसऱ्याचं आणि नाचतंय कोण? फडणवीसांचा राज ठाकरेंवर घणाघात

'मुळात मनसे ही मतदार नसलेली सेना आहे. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे' अशी टीका फडणवीस यांनी केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 03:06 PM IST

लग्न दुसऱ्याचं आणि नाचतंय कोण? फडणवीसांचा राज ठाकरेंवर घणाघात

नांदेड, 13 एप्रिल : आपल्याकडे म्हण आहे 'रताळ्याला म्हणतं केळं आणि लग्नात नाचतंय खुळं' अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी भाड्याने नेता आणला, अशी टीकाही त्यांनी केली.

नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. नांदेडमध्येच काल राज यांची सभा पार पडली होती. यासभेत राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राज यांच्या टीकेला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

'अशोक चव्हाणांनी भाड्याने नेता आणला'

'नांदेडच्या निवडणुकीत आता रंग भरला जात आहे. भाजपामुळे अशोक चव्हाण यांना लोक भाड्याने आणावे लागतं आहे. राज ठाकरे हे भाजपवर टीका करत आहे. यांचं असं झालं की, लग्न कुणाचं आहे आणि हे नाचताय. मुळात मनसे ही मतदार नसलेली सेना आहे. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे' अशी टीका फडणवीस यांनी केली.Loading...


'तुम्हाला घरी बसवलं'

राज यांनी फडणवीस यांच्यावर बसवलेला मुख्यमंत्री अशी टीका केली होती. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. 'राज म्हणाले हा बसवलेला मुख्यमंत्री आहेत. हो मला जनतेने बसवले आहे आणि याच जनतेनं तुम्हाला घरी बसवलं' असा टोला लगावला. तसंच 'आधे इधर जाओ ,आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ' पण मागे कुणीच नाही अशी राज ठाकरे यांची अवस्था झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

'मराठवाड्याचा वाळवंट आघाडी सरकारमुळे'

'राज ठाकरे म्हणाले मराठवाड्याचं वाळवंट झालं. अशोक चव्हाण उत्तर द्या, मराठवाड्याचं वाळवंट कोणी केलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणामुळे मराठवाड्याच वाळवंट केलं. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याच्या करार 2010 ला अशोक चव्हाण यांनी केला. मी तो करार रद्द केला आणि पाणी आणलं', असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.


====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...