News18 Lokmat

ATMमधून पैसे काढताना तुमच्यासोबत असं तर नाही ना होत?

डेबीट/क्रेडीट कार्डचे क्लोनींग करत अनेकांची लाखोंची फसवणुक करणाऱ्यास नाशिक ग्रामिण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 10:29 PM IST

ATMमधून पैसे काढताना तुमच्यासोबत असं तर नाही ना होत?

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 09 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात डेबिट/क्रेडीट कार्ड क्लोनींग करून नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अगदी हुशारी लोकांचा पासवर्ड आणि माहीती काढून त्यांचा लाखोंना गंडा घालण्याचं काम ही टोळी करत होती. अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं

डेबीट/क्रेडीट कार्डचे क्लोनींग करत अनेकांची लाखोंची फसवणुक करणाऱ्यास नाशिक ग्रामिण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आणखी एक आरोपी फरार असून त्याचा नाशिक ग्रामिण पोलीस शोध घेत आहेत.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे एटीएम मशीनमधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे मोबाईलद्वारे शुटींग काढून त्याद्वारे ग्राहकाचा अकाउंट नंबर आणि पासवर्ड माहीती करायचा. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून पैसे लंपास करायचे. परराज्यातील दोघांनी नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

हेही वाचा: '7 वर्षात राजकारणासाठी माझी 100 एकर जमीन गेली'

Loading...

जावेद वजीद खान या आरोपीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफिनं बिहारच्या पटणा येथून अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याचा आणखी एक साथिदार सदर गुन्ह्यात सहभागी असल्याचं समोर आलं. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून 1 Laptop, क्लोनिंग मशीन, कार्ड स्किमर, विविध बँकांचे 20 ATM CARD, 16 ब्लँक डमी क्लोन कार्ड, 3 स्मार्ट फोन, Software च्या तीन सिडी आणि एक दुचाकी असा ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नाशिकच्या पिंपळगाव इथे एका व्यक्तीला सदर दोघा आरोपींनी अश्याच प्रकारे गंडा घातला होता. त्याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवत तपास करून एकाला ताब्यात घेतल्याची माहीती नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंघ यांनी दिली आहे.

या सगळ्या प्रकारामुळे नागरीकांनी ATM मध्ये कुठल्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये, तसंच सावधगिरी बाळगावी असं आव्हान नाशिक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.


VIDEO : 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2019 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...