Home /News /news /

सफाई कामगार महिलेनं दिलं रुग्णाला इंजेक्शन, वाशिममध्ये घडला धक्कादायक प्रकार

सफाई कामगार महिलेनं दिलं रुग्णाला इंजेक्शन, वाशिममध्ये घडला धक्कादायक प्रकार

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा संतापजनक प्रकार समोर आला

     किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 27 जानेवारी : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून असं कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एका सफाई काम करणाऱ्या महिलेने रुग्णाला इंजेक्शन दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.  सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या महिला रुग्णाला इंजेक्शन देत असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ 25 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजेचा असून त्या सफाई कामगार महिलेच्या बाजूस कर्तव्यावर कार्यरत असलेली एक परिचारिका ही दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील असा जीवघेणा तसंच संतापदायक प्रकार उघड झाल्याने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह लागलं असून निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास सोनटक्के यांनी सांगितलंय जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील गरजवंत गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर तज्ञ व्यक्तीकडून उपचार होणं गरजेचं आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही. आपल्या कामात चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज असून प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Washim, WASHIM NEWS

    पुढील बातम्या