सरन्यायाधिश मिश्रांनी पीएमच्या प्रधान सचिवांना भेट नाकारली !

सरन्यायाधिश मिश्रांनी पीएमच्या प्रधान सचिवांना भेट नाकारली !

सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांना भेट नाकारली, कालच्या सगळ्या प्रकारानंतर खरंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं होतं तरीही आज सकाळीच पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे आज सकाळीच सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांना भेटायले गेले पण भेटण्यापूर्वी अपाईंटमेंट घेतली नसल्याचं कारण देत सरन्यायाधिशांनी प्रधान सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिलाय.

  • Share this:

13 जानेवारी, नवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांना भेट नाकारली, कालच्या सगळ्या प्रकारानंतर खरंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं होतं तरीही आज सकाळीच पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे आज सकाळीच सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांना भेटायले गेले पण भेटण्यापूर्वी अपाईंटमेंट घेतली नसल्याचं कारण देत सरन्यायाधिशांनी प्रधान सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे नृपेंद्र मिश्रा यांना सरन्यायाधिशांच्या शासकीय निवासस्थानापासून परत माघारी फिरावं लागलंय.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा हे केसेस वाटप करताना न्यायवव्यवस्थेने घालून दिलेले संकेत पाळत नसल्याचा गंभीर काल 4 मुख्य न्यायाधिशांनी केला होता. भारतीय न्यायव्यवस्थेत हे पहिल्यांदाच घडलंय. काल देशभर या प्रकारावरून मोठा गदारोळ माजलाय. भाजप सरकारवर न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप होतोय. म्हणूनच कदाचित सरन्यायाधिशांनी अशा परिस्थितीत प्रधान सचिवांना भेट नाकारल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधिश आणि इतर 4 मुख्य न्यायाधिशांमध्ये निर्माण झालेले मतभेद नक्कीच लवकर मिटतील आणि सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा देशाचे अॅटर्नी जनरल के. के. वेनुगोपाल यांनी व्यक्त केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading