IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया यूपीएससीमध्ये ठरला अव्वल

IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया यूपीएससीमध्ये ठरला अव्वल

भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा हा निकाल तुम्हाला upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेच्या निकालात महाराष्ट्राच्या तरुणांनी बाजी मारली आहे. या परीक्षेत देशातून पहिला आलेला कनिष्क कटारिया हा आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे. कनिष्कने आयआयटी मुंबईमधून बी टेक केलं आहे. कनिष्कने गणित हा विषय घेऊन एससी श्रेणीतून ही परीक्षा दिली होती.त्याने कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून बी टेक केलं आहे. तो राजस्थानचा आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली.

याच परीक्षेत सृष्टी जयंत देशमुख ही देशातून पाचवी आणि मुलींमधून पहिली आली आहे तर आळंदीजवळच्या दिघीची तृप्ती अंकुश धोडमिसे देशात 16 वी आली आहे. वैभव सुनील गोंदणे हा देशात २५ व्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच मनीषा आव्हाळे हिचा ३३ वा क्रमांक आहे. तर हेमंत केशव पाटीलने देशात 39 वा क्रमांक पटकावला आहे.

भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा हा निकाल तुम्हाला upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. या परीक्षेत कनिष्ट कटारिया भारतातून पहिला आला आहे तर अक्षत जैन आणि जुनैद अहमद यांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे तर तृप्ती धोडमिसे देशात १६ वी आली आहे. ती पुणे जिल्ह्यातल्या आळंदीजवळच्या दिघी गावामधली आहे. यूपीएससी परीक्षेची मुलाखतींची फेरी 4 फेब्रुवारी 2019 ला झाली होती. त्यानंतर हा निकाल आला आहे.

ही आहेत या परीक्षेतली टॉप 10 नावं

1. कनिष्क कटारिया

2. अक्षत जैन

3. जुनैद अहमद

4. श्रवण कुमात

5. सृष्टी जयंत देशमुख

6. शुभम गुप्ता

7. कर्नाटी वरूणरेड्डी

8. वैशाली सिंह

9. गुंजन द्विवेदी

10. तन्मय वशिष्ठ शर्मा

UPSC Result: How to check-

Step 1) UPSC च्या अधिकृत वेसबाईटवर जा upsc.gov.in

Step 2) 'Final result' link वर क्लिक करा

Step 3) PDF वर क्लिक करा

Step 4) तुमचा निकाल चेक करा

Step 5) पुढच्या कामासाठी प्रिंट आउट घ्या.

Direct link - UPSC Result

सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

First published: April 5, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या