परभणी, 10 मे : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे नगराध्यक्ष विजय तापडिया यांना बांधकाम प्रकरणावरून मारहाण करण्यात आली आहे. नगराध्यक्ष तापडियांनी बांधकाम प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून, सुशांत चौधरी आणि साहेबराव चौधरी या दोन आरोपींनी त्यांना मारहाण केली. तापडियांच्या डोळ्याला यामुळे इजा झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.