बीड, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. कोरोनाविरोधात लढ्यात काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना सर्वच स्तरातून पाठबळ दिलं जात आहे. परंतु, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात रोज सफाई करणाऱ्या कामगारांचे नागरिकांनी चक्क पाय धुवून शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार केला.
कोरोनाच्या संकटात सर्वात महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या स्वच्छता दूताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी हा उपक्रम घेतला. या वरून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना कळू लागलं आहे. वर्षानुवर्ष आंबेजोगाई शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या स्वच्छता सेवकांचा आज सामाजिक बांधिलकी आणि उतराई म्हणून सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - बारामतीतील त्या 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, पण दोन महत्त्वाचे रिपोर्ट येणे बाकी
लॉकडाउनमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांबद्दल सामाजिक उतराई म्हणून अंबाजोगाईत नागरिकांनी स्वच्छता सेवकांची पाय धुतले. अनेक वेळा आपण दिंडीमध्ये आणि गुरू पुजानंतर पाय धुवून औक्षवण करण्याची प्रथा पाहिली असेल. आज मात्र, सफाई कामगारांनी केलेल्या कामाबद्दलची उतराई म्हणून हा कृतज्ञता सोहळाच म्हणावा लागेल.
या सफाई कामगार च्या जोरावर शहराने अनेक वेळा स्वच्छतेचे पारितोषिकही जिंकले आहेत. मात्र, आजचा दिवस या सफाई कामगारासाठी नक्कीच आनंदाचा आहे कारण नागरिकांनी त्यांचे पाय धुऊन जणू त्यांना सुखद धक्का दिला.
हेही वाचा - 'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग
अंबाजोगाई शहराला अनेक वेळा पुरस्कार मिळाले आणि या पुरस्काराच्या जोरावर शहराचा महाराष्ट्रात एक वेगळा पॅटर्न तयार झाला. कोरोनाच्या काळात स्वच्छता करण्यात त्यांनी जी आपली चुनुक दाखवली म्हणून स्वच्छता कामगारांना न सांगताच रविवार पेठ येथील नागरिकांनी त्यांचा हा आगळावेगळा स्वरूपाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
कोरोनाने जग वेठीस धरले असताना वाईटातून चांगले म्हणतात तसे कोरोनामुळे स्वच्छतेसंदर्भात मोठी जनजागृती झाल्याचं पाहायला मिळत आहे. वैयक्तिक स्वच्छतेपासून ते परिसर स्वच्छतेला महत्व देऊन या स्वच्छता दूताच्या हाताचे काम कमी करून त्यांचे आभार मानत आपण देखील कोरोला हरवण्याचा संकल्प करू...
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed