आदित्य ठाकरे म्हणाले होते, 'केम छो', आता वरळीकर म्हणाले म्हणाले, 'मनसेत चाललो'!

आदित्य ठाकरे म्हणाले होते, 'केम छो', आता वरळीकर म्हणाले म्हणाले, 'मनसेत चाललो'!

ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आता मनसेनं धक्का दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आता मनसेनं धक्का दिला आहे. वरळी मतदारसंघातील नागरिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे.

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वरळी मतदारसंघातील नागरिकांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी हा प्रवेश केला आहे. वरळीमधील काही सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांनी मनसेत प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती  संतोष धुरी यांनी दिली.

'आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत वरळीच्या जनतेनं निवडून दिले आहे. ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांच्या कामाची प्रचिती इथल्या लोकांना झाली आहे. तुर्तास कोणत्याही निवडणुका नाही. पण मनसे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला आहे', असंही धुरी यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मनसेनं धक्का दिला होता. खैरे यांचे खास विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेत प्रवेश केला होता. एवढंच नाहीतर त्यांच्या पाठोपाठ आणखी सात शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला होता.

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. ठाकरे घराण्यातूनही पहिल्यांदाच कुणी तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या नावाची जेव्हा घोषणा झाली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी वरळीत उमेदवार देण्यास नकार दिला होता.

Published by: sachin Salve
First published: September 18, 2020, 11:57 AM IST

ताज्या बातम्या