विनाकारण हिंडणाऱ्या मुंबईकरांवर होणार कठोर कारवाई, CISF जवान एक्शनमध्ये

विनाकारण हिंडणाऱ्या मुंबईकरांवर होणार कठोर कारवाई, CISF जवान एक्शनमध्ये

  • Share this:

मुंबई, 21 मे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना मुंबईत सीआयएसएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. यांनी मुंबईचा ताबा घेतला असून हे जवान एक्शनमध्ये देखील आलेत. मुंबईतील भेंडी बाजार इथे या जवानांनी नागरीकांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

एकाच दुचाकीवर दोनजण विनामास्क फिराणाऱ्यांना दंड देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जीवघेण्या कोरोनाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन (Lockdwon) जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही अनेक भागांमध्ये नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी या विशेष तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.

एकीकडे जगभरात कोव्हिड 19 मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती 11 व्या स्थानावर आहे.

गुरुवारी ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची 112359 प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 3435 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात विचार केला तर कोरोनाच्या प्रकरणांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 5,609 नवीन प्रकरणं समोर आली असून 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोव्हिड 19 पासून देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 112359 पर्यंत वाढली आहे आणि 3435 लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 1561 लोकांचा मृत्यू झाला. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना विषाणूची लागण 5,082,661 वर झाली आहे आणि या साथीमुळे 329,294 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातनंतर तामिळनाडूमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 39 हजार 297 रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत इथे 2250 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली. गुजरातमध्ये एकूण 12 हजार 539 प्रकरणं आहेत, 24 तासांत 398 नोंद झाली आहे आणि तामिळनाडूमध्ये गुजरातपेक्षा जास्त 13 हजार 191 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 24 तासांत 743 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत.

First published: May 21, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या