पतीसाठी नराधमांचं ऐकलं, तिघांनी महिलेवर बलात्कार करून शूट केला VIDEO

पतीसाठी नराधमांचं ऐकलं, तिघांनी महिलेवर बलात्कार करून शूट केला VIDEO

आरोपी बनवारीलाल यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि शिव भगवान आणि साथीदार मांगीलाल यांनी पीडितेची व्हिडिओ क्लिप बनवली.

  • Share this:

चूरू, 08 ऑक्टोबर : सरदारशहर पोलिस ठाण्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या नवऱ्याला कामावरून काढून टाकेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह बलात्काराची घटना घडवून आणली. या संपूर्ण प्रकारमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी बनवारीलाल यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि शिव भगवान आणि साथीदार मांगीलाल यांनी पीडितेची व्हिडिओ क्लिप बनवली. पीडित महिलेच्या अहवालावरून आरोपी बनवारीलाल, शिव भगवान आणि मांगीलाल यांच्याविरूद्ध सरदारशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर चूरूच्या सरकारी भरतिया रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

बस चालक आहे बलात्कार पीडितेचा नवरा

पीडितेच्या नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल यांच्या मालकीच्या रोडवेजच्या कंत्राटी बसचा ड्रायव्हर आहे. आरोपीचं त्याच्या घरी येणं-जाणं असतं. 2 सप्टेंबर रोजी शिव भगवान आणि मांगीलाल यांनी नवीन घर दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपीच्या घरी नेलं. बनवारीलाल यांनी नवऱ्याला कामावरून काढून टाकू अशी धमकी देत तिच्या बलात्कार केला.

इतर बातम्या - दुर्दैवी! लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा मृत्यू, दुचाकीवरून जाताना कारने उडवलं

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून शोध घेत आहे. तर आरोपी घटनास्थऴावरून फरार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या