धक्कादायक! पहिल्यांदा छेड काढली नंतर वारंवार दिराने केला वहिनीवर बलात्कार

25 वर्षांच्या पीडित विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचं 9 वर्षापूर्वी तारानगरमध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या 4-5 वर्षानंतर दिर सतवीर तिची रोज छेड काढायचा.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 02:27 PM IST

धक्कादायक! पहिल्यांदा छेड काढली नंतर वारंवार दिराने केला वहिनीवर बलात्कार

चूरू (राजस्थान), 22 सप्टेंबर : नात्यांना काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दिराने वहिणीवर बलात्कार केला आहे. त्यानंतर तिला धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने तिच्या पती आणि सासूकडे तक्रार केली असता तिला मारहाण करून गप्प करण्यात आसं. एवढंच नाही तर प्रकरणा पोलिसांत जाऊ नये यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आला. पण अखेर पीडितेने धाडस दाखवून पोलिसांत आरोपीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सासरचे गप्प बसल्यामुळे आरोपी सोकावला...

25 वर्षांच्या पीडित विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचं 9 वर्षापूर्वी तारानगरमध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या 4-5 वर्षानंतर दिर सतवीर तिची रोज छेड काढायचा. यावर तिने पती आणि सासूकडे तक्रार केली. पण त्यांनी उलट विवाहितेवरच आरोप केले. तिचा छळ करण्यास सुरुवात केली. याचाच फायदा घेत आरोपी दिराने पीडितेवर बलात्कार केला. तिला धमकी देत तो तिच्यावर रोज बलात्कार करायला सोकावला होता. पीडितेने पतीला पुन्हा तक्रार केली पण तिला मारहाण करण्यात आली.

प्रकण दाबण्यासाठी पीडितेवर दबाव...

7 सप्टेंबर रोजी दिराने पीडितेला एकटं पाहिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याविषयी तिचा नवरा, सासू, मेहुणे यांना सांगितले, परंतु सर्वजण पीडितेला प्रकरण दडपण्यासाठी आणि कोणतीही कारवाई करण्यापासून रोखलं. पीडित महिलेच्या अहवालावरून आरोपी दिराविरोधात तारानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित विवाहितेची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

Loading...

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...