थंडींच्या दिवसात बीट हलवा खा आणि तंदुरूस्त रहा

थंडींच्या दिवसात बीट हलवा खा आणि तंदुरूस्त रहा

थंडीच्या दिवसात आरोग्य तंदुरूस्त ठेवण्यासाठी बीट खाल्याने होतात बरेच फायदे. तुमच्या आरोग्यासाठी आम्ही घेवून आलोय बीट हलव्याची रेसिपी

  • Share this:

मुंबई, 24जानेवारी: थंडीच्या दिवसात अनेकजण व्यायामाला सुरूवात करत असतात. थंडीच्या दिवसात जसा व्यायाम आरोग्यासाठी लाभदायी आहे तसा आहार ही महत्वाचा आहे. थंडीच्या दिवसात तुम्हाला तंदुरूस्त ठेवणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे बीट. सुका मेवा आणि स्निग्ध पदार्थ जसे आपल्याला थंडीचा सामना करण्यासाठी शक्ती देत असतात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवतात तसच बीट खाल्याने देखील आश्चर्यकारकरित्या मदत होते. आणि म्हणूनच आम्ही आपल्यासाठी बीटचा हलवा हि पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी घेवून आलो आहोत.

कसा बनवाल बीट चा पौष्टिक हलवा

थंडीमध्ये हलवा खाण्याची मजाच काही और आहे. गाजर हलवा तर आपण अनेकदा खाल्ला असेल पण आज आपण शिकुया बीट हलव्याची रेसिपी

बीट हलवा बनवण्यासाठी लागणारी सामुग्री

बीट-2

तूप- 3 टेबल स्पून

दूध- 300 mL

मनुके- 1 टेबल स्पून

काजू-12 (बारीक कापलेले)

बदाम-10 (बारीक कापलेले)

वेलदोडे-6

साखर- प्रत्येकालं जितकं गोड हवं आहे त्यानुसार

बीट हलवा बनवण्याची प्रक्रीया

1.बीट हलवा बनवण्यासाठी सर्वात प्रथम बीट स्वच्छ धुवून घेवून त्याची साल काढून घ्या आणि खिसून घ्या.

2.आता गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तूप टाकून कापले काजू, बदामचे तुकडे टाकून हलकासा परतून घ्या. साधारण गुलाबी रंग येइल इतपत बदाम आणि काजू परता. त्यानंतर एका वाटीत काढून घ्या.

3.आता कढईत 2 चमचे तूप टाकून खिसलेलं बीट टाकून साधारण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. खिसलेलं बीट परतताना गॅस मध्यम असावा. बीट परतल्यानंतर आता त्यामध्ये दूध टाका. दूध टाकल्यानंतर 7 मिनिटं मध्यम स्वरूपाच्या गॅसवर शिजू द्या.

4. हलवा शिजत असताना अधून मधून चमच्याच्य मदतीने हलवत रहा.

5.हलवा शिजत आल्यावर त्यामध्ये वेलदोडा टाकून हलवा हलवत रहा. जेव्हा हलवा घट्ट होइल तेव्हा त्यात साखर टाकून साखर हलव्यात एकजीव होइपर्यंत चमचाने हलवत रहा. सोबतच हलव्यात मनुकेदेखील टाका.

6.हलवा घट्ट होइपर्यंत शिजू द्या. जेव्हा हलवा घट्ट होइल तेव्हा सुका मेवाही टाका. सुका मेवा टाकून झाल्यावर सर्व गोष्टी हलव्यात एकजीव होइपर्यंत 5 मिनिटं शिजू द्या.

आणि अशाप्रकारे खाण्यासाठी आपला पौष्टिक बीट हलवा तयार.

First published: January 24, 2020, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या